दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात पत्रकार, साहित्यिक, कवी, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक, अभिनेते, गायक, संगीतकार तसेच ‘आम्ही मुंबईकर’ या साप्ताहिकाचे संपादक प्रमोद सूर्यवंशी यांना प्रतिष्ठेचा ‘विवेक-दीप पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ प्रदान करून श्री. सूर्यवंशी यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यास साहित्य, पत्रकारिता, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी श्रीधर कीर, प्रा. विष्णुभाऊ बापट, कवी अरुण म्हात्रे, साहित्याचार्य पंढरीनाथ तामोरे, ज्येष्ठ पत्रकार गुरुनाथ मधुसूदन तिरपणकर, डॉ. सुनील भार्गवराम शिंदे, समाजसेवक वैभव सुरेश कदम, कृष्णा बाळू काजरोळकर, अभिनेते व समाजसेवक डॉ. गौरव जयवंत पाटील आणि अतुल तोडकरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रमोद सूर्यवंशी यांनी हा सन्मान आपल्या वाचक, सहकारी आणि साहित्यप्रेमींना समर्पित करत, भविष्यातही लेखणीच्या माध्यमातून समाजहितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
या उल्लेखनीय सन्मानाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील साहित्यिक, पत्रकारितेतील आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.










Add Comment