
मित्रांनो हल्ली बॉक्सऑफिसवर “झिम्मा 2” हा सिनेमा चांगलाच हाउसफुल ठरतोय. त्यामुळे या सिनेमाविषयी आणि यातील कलाकारांविषयी सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने तिचा हिंदी मालिकेतील एक अनुभव शेअर केला आहे. यावेळी तिने सांगितले की मला एका हिंदी मालिकेतून काही दिवसातंच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. हल्लीच तिने सुलेखा तळवलकर यांच्या “दिल के करीब” या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा प्रसंग सांगितला आहे.
“देवयानी” या मालिकेतून प्रसिद्धीत आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे. उत्कृष्ठ अभिनय आणि अप्रतिम सौंदर्याच्या जोरावर शिवानीने अतिशय कमी कालावधीत मराठी सिनेसृष्टीमध्ये आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं. तसेच बिग बॉस मराठीमध्ये देखील ती झळकली होती. नुकत्याच प्रदाशित झालेल्या “झिम्मा 2” या सिनेमात देखील तिने आपली चुणूक दाखवली आहे. परंतु, मराठीतील पॉपुल्यर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शिवानीला एका हिंदी मालिकेतून बाहेरचा रस्ता पाहावा लागला होता.
आपल्या मुलाखतीत शिवानी म्हणते की, “मी आठवीत असताना माझे नाटकातील काम पाहून एका मालिकेसाठी माझी निवड करण्यात आली होती. झी टीव्हीवरील ‘अगले जन्म मोहे बिटीयां किजो’ या मालिकेत मला काम मिळाले होते. मात्र, १० दिवस शूटिंग असेल तरच काम करायचे नाहीतर नाही करायचे, असा माझ्या आईचा नियम होता. तेव्हा मी अभिनयक्षेत्रात फारच नवीन होते. त्यामुळे टीव्हीवर कसे काम करायचे, कॅमेरा कसा फेस करायचा…वगैरे मला समजावून सांगू शकेल असे माझ्या घरी कोण नव्हते. त्यामुळे मला व्यवस्थित काम करता आले नाही. म्हणून मला 2 ते 3 दिवसांतच त्या मालिकेतून काढून टाकलं.”
शिवानी पुढे म्हणते की,मला या गोष्टीचे खूप वाईट वाटलं होत. परंतु मी अजिबात हर मानली नाही व ऑडिशन्स द्यायचे सुरु ठेवले. त्यावेळी मला मालिकेच्या निर्मात्यांचा फोन आला आणि तुम्ही काम केलेल्या दिवसांचा चेक घेवून जा,असे ते म्हणाले. पण मला मालिकेतून काढून टाकले होते त्यामुळे तो चेक घ्यायला कसे जायचे,हा विचार करून मला कसतरी वाटत होत.म्हणून मी अगोदरचे 2-3 महिने गेलेच नाही. मग त्यांनी मला पुन्हा फोन केला तेव्हा मात्र जावं लागलं.
अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या करिअर विषयी सांगायचे झाले तर, तिने आतापर्यंत देवयानी, फुलवा,अनामिका, तू जीवाला गुंतवावे अशा कित्येक हिंदी आणि मराठी मालिका तिने केल्या आहेत. त्यासोबतच सातारचा सलमान, वाळवी, ट्रिपल सीट आणि आता झिम्मा 2 अशा अनेक सिनेमांमध्ये देखील तिने काम केले आहे.











Add Comment