Bollywood Entertainment

या गोष्टीसाठी केला कंगना रणौत ने आई- वडिलांचा त्याग, ऐकून तुम्हांलाही बसेल धक्का

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिची इंडस्ट्री मध्ये एक वेगळीच ओळख आहे. आपल्या विशिष्ट वक्तव्यांमुळे सदैव चर्चेत राहणारी ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हल्लीच झालेल्या एका मुलाखतीत कंगनाने आपल्या अभिनय कारकिर्दीतील तिच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रियांबद्धल सांगितले आहे. कंगना म्हणते की, तिचे वडील चित्रपटात काम करण्याच्या  विचाराला मुळीच सहमत देत नव्हते.

    कंगना म्हणते की, ‘जेव्हा मी माझे शिक्षण सोडून दिल्लीला जाऊन चित्रपटात काम करण्याचा विचार केला,तेव्हा माझ्या वडिलांनी मला अजिबात साथ दिली नाही. मी उच्च शिक्षण घ्यावे अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी मला चंदीगडला पाठवले.मात्र मी ते सर्व सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मला खूप मोठी स्वप्ने बघायला शिकवले होते, परंतु ही एक वेगळी गोष्ट आहे की, जेव्हा माझी स्वप्न खूप  मोठी झाली, तेव्हा तीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या होती.

अभिनेत्री कंगना पुढे म्हणते की, जेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितले की, मला अभ्यासाऐवजी काहीतरी वेगळे करायचे आहे,जसे की थिएटर…..तेव्हा त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळे जर तुला हे करायचे असेल तर तुला आमचा त्याग करावा लागेल.मला जे काही माहित आहे की, त्याद्वारे मी तुला योग्य मार्ग दाखवू शकतो. कारण तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझा वडील आहे. मात्र तुला जर अभ्यास सोडून मुंबई आणि दिल्लीत थिएटर करायचे असेल तर ते मात्र आमच्या आवाक्याबाहेर आहे.

अभिनेत्री कंगना राणावत पुढे म्हणते की, मी माझ्या मनाची तयारी केल्यावर माझ्या वडिलांनी मला सांगितले की, आता ते माझ्या कोणत्याही गोष्टीसाठी जबाबदार नाहीत आणि ते आता माझे पालक देखील होणार नाहीत.यापुढे जे करायचे असेल ते तू स्वत: कर. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, कंगनाने आपल्या वडिलांना आपला खरा हिरो असे संबोधले आहे. तसेच तिने सांगितले की, त्यांनी मला जगाच्या सत्याबद्धल शिकवले आहे. जर मी माझ्या आयुष्याची जबाबदारी घेतली नसती तर मी आज इथवर येवून पोहोचली नसते.

कंगनाने आपल्या अभिनयाच्या करियर विषयी सांगताना एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली की, “माझी रायफल आण, मी तुला गोळ्या घालतो.” ती पुढे म्हणाली की, माझ्या करियर मधील यशप्राप्तीमुळे त्यांना गोंधळात टाकले.कारण मी माझ्या अभिनयशैलीने नाव कमावले, त्यामुळे आज त्यांना माझा अभिमान आहे.