
उफ्फ हे वाढलेले पोट…. सतराशे साठ उपाय करून देखील कमी होत नाही. काय करावे, काही एक सुचत नाही बुवा.. वेट कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खावू नये, ही चिंता बहुतांश लोकांना सतावते. कारण एकदा पोट वाढले की ते कमी होतचं नाही. पण मित्रांनो तुम्ही टेन्शन मुळीच घेवू नका. कारण आम्ही तुम्हांला काही अशा जबरदस्त ट्रिक्स सांगणार आहोत,ज्यामुळे तुमचे पोट तर कमी होईलच पण त्याच बरोबर तुमचे वजन देखील एकदम परफेक्ट नियंत्रणात राहील. आजकालची जनरेशन ही पोट कमी करण्याच्या त्रासाने खूपच वैतागली आहे. त्यामुळे बहुतेकजण ब्रेकफास्ट करणे टाळतात. परंतु असे केल्याने त्याचा आपल्या शरीरावर खूप सखोल परिणाम होतो.
पब्लिक रिसर्चच्या रिपोर्टनुसार साउथ इंडिअन पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो.ज्यामुळे आजारांचा धोका सुद्धा कमी होतो. त्यामुळे वेट कमी होण्यासोबतच डायबिटीसचा धोका देखील टळतो.
नाश्त्याला या पदार्थांचे सेवन केले तर आपल्या शरीरातील अवाजवी फॅट्स जमा होण्याची शक्यता कमी होते.
डोसा सांभार
वेट लॉससाठी आपल्या आहारात डोसा-सांभारचा समावेश करू शकता. तांदूळ आणि उडीद डाळीमुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होत नाही. हा पदार्थ नॉन स्टीक पॅन मध्ये खूप छान बनतो. जो कमी तेलकट आणि हेल्दी असतो. त्याचप्रमाणे पचायला देखील खूपच हलकाफुलका असतो.
उपमा
उपमा हा भाज्यांपासून आणि रव्यापासून बनवता येतो. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी अगदी साधा आणि झटपट बनवू शकता. यामध्ये कमीत कमी तेल आणि जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करावा.
नाचणी बॉल्स
आपल्या आहारात नाचणी बॉल्सचा समावेश करू शकता. नाचणी आरोग्यासाठी हेल्दी असते. नाचणी बॉल्स हे नाचणीच्या पीठापासून बनवतात. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही.
इडली
वजन कमी करण्यासाठी इडली चटणी आणि मसाला इडलीचा आपल्या आहारात समावेश करावा. इडली बनवण्यासाठी तांदूळ व डाळ वाटून त्याचे एकत्रित मिश्रण करा. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. त्यामुळे लवकर भूक लागत नाही.
उत्तपम
इडली-डोसा आणि उत्तपा हे पदार्थ उडीद डाळ आणि तांदूळ भिजवून केले जातात. आपले वजन नियंत्रणात आणण्यासाठी प्रोटीन आणि फायबर्स चे अधिक प्रमाणात सेवन केले पाहिजे. कमी कॅलरी चे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका टळतो.








Add Comment