Entertainment Marathi

“देऊनी वचने एकमेकांस साताजन्माची” तितिक्षा- सिद्धार्थ यांचा विवाहसोहळा संपन्न,

सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके या लव्हबर्डचा शुभविवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. सोशल मीडियावर या जोडीच्या विवाहाचे काही सुंदर फोटोज वायरल झाले आहेत. त्यांचे चाहते तर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

सिद्धार्थ आणि तितिक्षा मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. तेव्हा त्यांनी एक फोटो शेअर करत आपल्या नात्याबद्धल सांगितले होते. अखेर आज ही जोडी विवाहाच्या पवित्र बंधनात बांधली गेली.

 तितिक्षा व सिद्धार्थ यांनी आपल्या लग्नासाठी पेस्टल कलर निवडले होते. तितीक्षाने व्हाइट आणि गोल्डन बॉर्डर असलेली नऊवारी नेसली होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचं धोतर परिधान केले होते. त्यांच्या या लूकने ते दोघेही अगदी ब्यूटिफूल कपल दिसत होते.

कालपासूनच तितिक्षा आणि सिद्धार्थ यांच्या विवाहाच्या विधींना सुरुवात झाली होती. हळद, साखरपुडा व संगीत हे सर्व कार्यक्रम अगदी छान पार पडले. त्यांनतर ही जोडी विवाहाच्या पवित्र बंधनात अडकली. या हटके जोडीच्या लग्नाला त्यांच्या मित्रपरिवारासह मराठी सिनेसृष्टीतील कित्येक सितार्यांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री अनघा अतुल, रसिका सुनील, ऋतुजा बागवे, ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर ही सर्व मंडळी उपस्थित होती.

सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे या दोघांनी ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केले होते. तर तितीक्षाने ‘असे हे कन्यादान’,’सरस्वती’, ‘तू अशी जवळी रहा’ अशा अनेक नावाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. तर सध्या ती झी मराठी वाहिनीवरील “सातव्या मुलीची सातवी मुलगी” या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याचप्रमाणे सिद्धार्थ  बोडके याने ‘दृश्यंम 2’ या बॉलिवूड चित्रपटात व नुकतेच ‘श्रीदेवी प्रसन्न’ या मध्ये देखील झळकला होता.