Entertainment Marathi

अरेच्चा, अभिनेत्री हृता दुर्गुळेची ही “गुडन्यूज” तुम्हांला ठाऊक आहे का?

‘फुलपाखरू’  या मालिकेमुळे मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. थोडक्यात सांगायचे तर ती संपूर्ण महाराष्ट्राची ‘क्रश’ म्हणून ओळखली जाऊ लागली. हृताने आजवर कित्येक मराठी मालिका व चित्रपटातून आपल्या चाहत्यांची मन जिंकली आहेत. तर हल्लीच हृताने आपल्या चाहत्यांना एक झकास गुडन्यूज दिली आहे.

       आपल्या हृताने नुकतंच एक नवीन घर खरेदी केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याबद्धलची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. हृताने इन्स्टाग्रामवर आपला पती प्रतिक शाह याच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने एकदम हटके कॅप्शन दिले आहे. “एक नवी स्वप्नवत सुरुवात. प्रेम आणि स्वप्न. नवीन घर आणि विशेष दिवस”, असे कॅप्शन दिले आहे. तर या फोटोमध्ये हे कपल एकमेकांसोबत खूपच आनंदी दिसत आहे.

       हृताच्या करीअरविषयी म्हणायचे झाले तर, तिने २०१२ साली ‘पुढच पाऊल’ या मालिकेत सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून भूमिका साकारली होती. तिची ही मालिका बरीच चर्चेत आली होती. त्याचप्रमाणे स्टार प्रवाह वरील ‘दुर्वा’ या मालिकेत हृताने सुयश टिळक आणि हर्षद अटकरी यांसोबत मुख्य भूमिका साकारली. साधारणत: तीन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तेव्हापासूनच हृता दुर्गुळे नावारूपास येवू लागली. त्यानंतर २०१७ मध्ये “फुलपाखरू” या मालिकेमुळे तिच्या करिअरला एक नवीन वळण मिळाले व हृता अखंड महाराष्ट्राची लाडकी झाली.

        मित्रांनो तुम्हांला आमचा लेख कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा. अशाच अनेक नवनवीन घडामोडींचे लेटेस्ट अपडेट्स आम्ही तुम्हांला देत जाऊ.